Pune District Education Association's
ANNASAHEB MAGAR MAHAVIDYALAYA , HADAPSAR PUNE.
( Affiliated to Savitribai Phule Pune University )
"NAAC Grade A+ (3.33 CGPA)" Estd. 1971 | Uni. Reg. No. PU / PN / E.S.C. : 029(1971) | Junior Col.NO. 11.15.005 | H.S.C. Voc. Index No. J-11..15.901 | Affiliated to Savitribai Phule Pune University | |Best College Award, SPPU

Welcome To Marathi Department



'Marathi Vangmay mandal Udghatan Samarambh'

'Lokkalakarancha Parichay '

'Lokkalakarancha Parichay 2'

' प्रसिद्ध अनुवादिका डॉ.उमा कुलकर्णी यांची विशेष मुलाखत '

'मराठी विभाग विविध बातम्या '

'मराठी विभागास मान्यवरांची भेट '

'research center'

'Research center marathi'

'Film Club'

'मराठी भाषा गौरव दिन'

'आदिवासी बोलींचे दालन'

'काव्यवाचन'

'मराठी स्वाक्षरी अभियान'

'शुद्धलेखन कार्यशाळा'

'मराठी भाषा गौरव दिन'

'मराठी भाषा गौरव दिन'

About Department

मराठी विभागाबद्ल

      पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जून १९७१ला  मराठी विभाग सुरू करण्यात आला .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने सुरू झालेल्या या महाविद्यालयातील मराठी विभागाने विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक प्राप्त करणारे विद्यार्थी घडवले आहेत.

      माजी  शैक्षणिक मंत्री ,खासदार व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कै.रामकृष्ण मोरे हे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. संवेदनशील ग्रामीण विद्यार्थ्यांना भाषाआणि साहित्य यांच्या अध्यापन करताना विभागात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. असा भक्कम शैक्षणिक आणि वैचारिक पाया या विभागाला लाभला . प्रा.दामोदर गाढवे ,प्रा.शेख, प्रा. डॉ.शोभा पाटील, प्रा.डॉ. बल्लाळ, प्रा.डॉ. सुनंदा थोरात ,प्रा.डॉ. प्रविण ससाणे,प्रा.डॉ. शोभा तितर,प्रा.डॉ. नाना झगडे,प्रा.डॉ. नानासाहेब पवार यांनी या विभागात अध्यापन केले आहे .

      विभागातील प्राध्यापकांनी एम.फील व पी.एच.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे .ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना एम.फिलव पी.एच. डी पातळीवरील  संशोधनाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी संशोधन केंद्र प्राप्त व्हावे म्हणून विभाग प्रयत्नशील आहे.

      "१९७५ ते २०००या कालखंडातील स्त्री नाटककारांचा नाट्यलेखनाच्या स्त्रीवादी अभ्यास" या विषयावर संशोधन व विद्यापीठ परिचय - राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १४ शोधनिबंधाचे वाचन११ शोधनिबंध संशोधन पत्रिका व ग्रंथांमध्ये प्रकाशित "स्त्री- अभ्यासाच्या विविध दिशा " या ग्रंथाचे संपादन स्त्रीवाद आणि स्त्री साहित्य हे विशेष अभ्यासाचे    विषय
      प्रा.सरिता सोमाणी ,प्रा.निवृत्ती तर्फे,प्रा.सागर कांबळे या  विद्यार्थ्यांनी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेकांनी पी.एच.डी  पदवी संपादन केली आहे.

      श्रेष्ठ साहित्यिकांना  विचारवंत व अभ्यासकांना विभागात आमंत्रित करणे. विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडून आणणे. तज्ञांची व्याख्याने आयोजित करणे .चर्चासत्रे, कार्यशाळा ,सातत्याने घेऊन विभाग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या   मुख्य धारेतील अनेक प्रवाहांची  ओळख करून देण्याचे कार्य विभागाने सातत्याने केले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत मा .प्रा. डॉ.हरी नरके हे विभागाचे माजी विद्यार्थी असून महाविद्यालयीन कालखंडापासून अनेक वादविवाद ,वकृत्व स्पर्धांमध्ये  यश मिळवून  ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले  अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्य केले. श्रद्धा पवार (चौधरी) प्रा. डॉ .उमा काळे माजी विद्यार्थिनी ही विद्यापीठाची सुवर्णपदक प्राप्त केले आहे. विभागातील डॉ .प्रविण ससाने डॉ. विवेकानंद ससाने प्रा.संदीप तापकीर प्रा.वसंत गावडे प्रा. डॉ उमा काळे प्रा .हेमा भंडारी प्रा .वंदना सोनवणे प्रा.सागर भराटे  प्रा.विजया कांबळे प्रा.सरिता सोमाणी  प्रा.निवृत्ती टारफे प्रा.सागर काबंळे इ. विद्यार्थ्यांनी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत .अनेकांनी पी .एच .डी पदवी संपादन केली.विभागातील अनेक विद्यार्थी विविध श्रेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

 

Aims - राज्यभाषा आणि मातृभाषा म्हणून मराठीचे स्थान महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे

Objectives- विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकासित करणे
        उदा:- श्रवण कौशल्य , वाचन कौशल्य ,लेखन कौशल्य , भाषण व संभाषण कौशल्य इत्यादी मराठी भाषेतील साहित्याचा परिचय करून देणे विद्यार्थ्यांची साहित्य आस्वाद क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक उपयोजकांच्या आत्मविश्वास निर्माण केले.

मराठी विभागाचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा अहवाल

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर, पुणे येथील मराठी विभागाचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे. या शैक्षणिक वर्षात विभागातर्फे विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १२ जुलै २०२५ रोजी फिल्म क्लब अंतर्गत 'ना. धो. महानोर : नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या जीवनपटासह त्यांनी सादर केलेल्या कवितांचा संपूर्ण माहितीपट दाखविण्यात आला. याप्रसंगी एस.एम. जोशी महाविद्यालयातील डॉ. अतुल चौरे आणि संशोधन केंद्रातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर, अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन निसर्ग, पाऊस, सामाजिक परिस्थिती, प्रेम आणि मैत्री यांसारख्या विविध विषयांवर कविता सादर केल्या. याशिवाय, शेतकऱ्याची व्यथा, आई-वडिलांचे कष्ट आणि स्त्री-भ्रूण हत्या यांसारख्या गंभीर विषयांवरील सादरीकरणाने सभागृहातील वातावरण भावूक केले. ६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणाचा मूळ व्हिडीओ दाखवून दृक-श्राव्य माध्यमातून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. पुढे, १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये काव्यवाचन, ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला, ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी स्वाक्षरी अभियान असे विविध कार्यक्रम पार पडले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रा. मुबीन तांबोळी यांच्या हस्ते ४० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या 'आदिवासी बोलींचे दालन' या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर पंधरवड्याचा समारोप ब्रिगेडियर रमाकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या मराठी स्वाक्षरी अभियानाने झाला. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करताना 'महापुरुषांचे व समाजसुधारकांचे मराठी भाषाविषयक कार्य' यावर विद्यार्थ्यांसाठी विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्राचार्यांच्या हस्ते 'जागर बोलींचा' या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या परिसंवादात अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी भाषेच्या विकासातील योगदानावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. याव्यतिरिक्त, तृतीय वर्ष वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी थेऊर येथील रमाबाई पेशव्यांच्या समाधी स्थळाला आणि बोलीभाषा व लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास सहल, तसेच पुणे येथील 'दैनिक सकाळ' कार्यालयाला औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या प्राविण्याचा विचार करता, विशाल लोंढे व दर्शन मुळे या विद्यार्थ्यांनी एनसीसी औंध येथील तेरा दिवसीय 'आर्मी अटॅचमेंट' च्या 'मराठा लाईट इन्फंट्री' राष्ट्रीय कॅम्पमध्ये, तर ऋतुजा राजेंद्र पोपळघट हिने राजस्थान येथील 'हल्दीघाटी ट्रेकिंग कॅम्प'मध्ये सहभाग नोंदवला. तसेच, स्वप्नील जोशी आणि किरण पाटमोरे यांची विद्यापीठस्तरीय 'आविष्कार संशोधन स्पर्धे'साठी निवड झाली.

प्राध्यापकांच्या कामगिरीतही विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. प्रवीण ससाणे यांचे तीन शोधनिबंध आंतरविद्याशाखीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले. डॉ. नाना झगडे यांनी 'अध्ययन आणि अध्यापनामध्ये भावनिक बुद्धिमत्ता' या विषयावरील एफडीपी कोर्स पूर्ण केला. डॉ. वंदना सोनवले यांना महाविद्यालयाचा २०२५-२६ चा 'गुणवंत शिक्षक पुरस्कार' प्राप्त झाला असून, त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित स्वच्छ वारी, राष्ट्रीय एकात्मता शिबीर आणि प्रेरणा कौशल्यविकास शिबीर यामध्ये संयोजन समिती सदस्य म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच त्यांचे दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी एफडीपी कोर्सही पूर्ण केला आहे. प्रा. सुरज काळे यांनी विविध आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये तीन शोधनिबंधांचे वाचन व प्रकाशन केले, मराठी विषयात चौथ्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि युनेस्को व जिओ इन्स्टिट्यूट अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल शिक्षणावर आधारित अनेक महत्त्वपूर्ण ऑनलाइन कोर्सेस पूर्ण केले. प्रा. सुनील भोपे यांनी राज्यस्तरीय चर्चासत्रात 'डिजिटल माध्यमे आणि मराठी साहित्यनिर्मिती' यावर शोधनिबंध वाचन केले आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सलग १८ तास अभ्यास उपक्रमात डॉ. वंदना सोनवले, प्रा. सुरज काळे आणि प्रा. सुनील भोपे या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवून या शैक्षणिक वर्षाची यशस्वी सांगता केली.